बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा

– नियमित लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात बुधवार (ता.०८) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच वंचित बालकांची यादी तयार करून पुढील महिन्यांत त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घेत बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा असे निर्देश मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपस्थितांना दिले.

बैठकीत मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक खान, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजय तिवारी, दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, आशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच ‘हाय रिस्क एरिया’ मध्ये जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. मोबाईल व्हॅनने लसीकरणात गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे त्यांची यादी तयार करावी व येणाऱ्या महिन्यात त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आशा सेविकांना दिले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या, महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ स्वर्णा रामटेके यांनी १८ वर्षवरील व्यक्तींना बीसीजी लसीकरण कसे द्यावे, क्षयरोग होऊ नये त्याकरिता मनपाच्या सहकार्याने कसे कार्य करता येईल याचा आराखडा मांडला. क्षयरोगाकरिता प्रथमोपचार, रुग्ण निहाय निकष, वयस्कांमध्ये बीसीजी लसीकरणाचे फायदे, यासर्व बाबींवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत आशा सेविका, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, टीबी चॅम्पियन्स यांनी समन्वय साधून कार्य करावे असे देखील डॉ. दीपक सेलोकर यांनी निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त नदी/रस्त्याच्या विकासकामांचा मार्ग मोकळा

Sun May 12 , 2024
– आचारसंहितेमुळे प्रलंबित रु. 177.64 कोटीच्या विकास कामांना निवडणूक आयोगाची परवानगी नागपूर :- नागपूर शहरातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या नाग नदीसह पिवळी आणि पोहरा नदीच्या संरक्षक भिंती व रस्त्यांच्या १७७.६४ कोटींच्या १२० विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आचारसंहितेमुळे शहरात थांबलेली पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने नागपूर महानगर पालिकेला परवानगी दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून परवानगी देणारे पत्र मंगळवारी राज्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com