मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

नागपूर :- मराठा, कुणबी मुला-मुलींसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यामार्फत “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2024-25” करिता 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाकरिता (पीएचडी) क्युएस जागतिक मानांकन क्रमवारीत 200 च्या आत असणाऱ्या व परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभागांतर्गत ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 अंतिम मुदत असून जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. या योजनेविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'हिंदू इकोसिस्टम' बनाने के लिए प्रत्येक राज्य में हिंदू राष्ट्र समन्वय समिति की स्थापना कर हिंदुओं पर हो रहे अन्याय के विरुद्ध जन आंदोलन करेंगे!

Wed Jul 3 , 2024
– वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ में एक हजार हिंदुत्वनिष्ठों का उत्स्फूर्त सहभाग! गोवा :- हर साल ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ के लिए देश-विदेश से आने वाले और ‘हिंदु राष्ट्र’ की अवधारणा से जुड़े सभी हिंदू संगठनों ने ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिति’ के माध्यम से साल भर सक्रिय रहने का निर्णय लिया है। इसके माध्यम से हिंदू ‘इको-सिस्टम’ बनाने का प्रयास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com