भंडारा, दि. 17 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त 14 नोव्हेंबर 2021 रोजी युवा रुरल चाईल्ड लाईन यांच्या मार्फत इंदिरा गांधी वार्ड येथे चाईल्ड लाईन दोस्ती सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चाईल्ड लाईनची माहिती व बालकांचे अधिकार, बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षेकरु, सापडलेले बालक, बालकांना उद्भवणाऱ्या समस्या या बद्दल माहिती देण्यात आली. चाईल्ड लाईन सप्ताह मध्ये नागरिकांनी चाईल्ड लाईन सोबत मैत्री करुन आपल्या परिसरातील समस्या ग्रस्त बालकांची मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात बालकांना चाचा नेहरू यांच्या जीवन चरित्र बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच बालकांची प्रभात फेरी काढण्यात आली. सदर कार्यक्रमाला इंदिरा गांधी वार्डचे नगरसेवक दिनेश भूरे, डॉ. परीघ गजभिये, मॅजीक बस इंडिया फाउंडेशनच्या कोमल चौधरी, विद्या निपाने, चाईल्ड लाईनच्या जिल्हा समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार, समुपदेशिका वैशाली सतदेवे, टीम सदस्य सुरेखा गायधने, पंकज पत्रे व नागरिक उपस्थित होते.