संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 1- समता सैनिक दल यूनिट कामठी च्या वतीने यशोधरा बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर कळमना रोड, कामठी या ठिकाणी दिनांक 30 सप्टेंबर 2022 ला समता सैनिक दलाला नवीन आयाम प्रदान करणारे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे भाष्यकार, आंबेडकरी योद्धा ॲड. मार्शल विमलसूर्य चिमणकर सर यांच्या स्मृतिदिनानिमित्य आदरांजली अर्पण करण्यात आली.*
कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दल यूनिट कामठी चे मार्गदर्शक ओमप्रकाश मेंढे होते. प्रमुख पाहुने म्हणून विरेन्द्र मेश्राम ससैदल यूनिट कामठी (बौद्धिकप्रमुख) यानी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन मार्शल सुमेध टेम्भूरने , प्रास्ताविक मार्शल निलेश मानवटकर ,तर कार्यक्रमाचे आभार रितिक रंगारी यांनी केले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित यशोधरा बुद्ध विहार महिला मंडळ, डॉ. आंबेडकर वाचनालय तथा समता सैनिक दलाचे मार्शल नीलेश मेश्राम, राजीव शेंडे , सतीश मेश्राम , अनित्य बेलकर, आकाश गेडाम, बागडे सर, प्रशिक मेंढे, प्रवीण टेंभुर्णे, सिद्धी नागदेवे, कसक मेश्राम, अक्षय चिंचखेड़े, मनोज गजभिये, धम्मा धारकर, संजय घरड़े, सावन नागदेवे, रवि उन्दिरवाड़े यांच्या उपस्थितीत आदरांजली पर कार्यक्रम संपन्न झाला.