नागपूर :- दिनांक २०.०५.२०२३ मे २३.०० वा. ते २३.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे धंतोली हद्दीत डि.पी. रोड समोरील मैदान, धंतोली येथे माती घेवून जाण्यासाठी ट्रक क्र. एम. एच. ४० सि.डी ०८५४ चा चालक नामे रोहन नकुल गौतम वय ३५ वर्ष नरसाळा, दिघोरी, नागपूर याने त्याचा ट्रक लावला होता. पोकलेनने माती लोडीग करण्यास वेळ असल्याने ट्रकचे बाजुला जमीनीवर झोपला होता. आरोपी ट्रक क्र. एम. एच. ४० सि.डी १३६४ चा चालक सैय्यद वसीम सैय्यद नासौर वय २८ वर्ष रा. गुलशन नगर, शारदा ले आउट, खरबी याने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून झोपलेल्या रोहन गौतम याचे अंगावरून ट्रक नेवून गंभीर जख्मी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला. याप्रकरणी फिर्यादी संदीप कोसा धुर्वे वय २६ वर्ष रा. जाफर नगर, यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम ३०४(अ), २७९, भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.