संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी स्कुल जवळ वाहन क्र एम एच 31 डी एस 3937 ने गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर वाहन ताब्यात घेत वाहनातील 7 गोवंश जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री 11.45वाजता केली असून या धाडीतून टाटा सुपर एस क्रमांक एम एच 31 डी एस 3937 किंमत 2 लक्ष रुपये, 7 गायी जनावरे प्रत्येकी किंमत 7000/ रु एकूण किंमत 49,000/ रु असा एकूण 2 लक्ष ,49 ,000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर घटनास्थळातून पळ काढण्यात आलेल्या वाहन चालक व मालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त श्रावण दत्त , सहायक पोलीस आयुक्त नलावडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिस उपनिरक्षक केरबा माकणे, हवालदार गावंडे पोलीस नाईक अश्विन चहांदे, पोलीस शिपाई विवेक दोरसेटवार यांनी केली.