नागपूर :- इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूर सेंटरच्या वतीने 8 व 9 नोव्हेंबर रोजी, सकाळी 9:30 वाजता. VNIT कॅम्पस च्या ऑडिटोरियम येथील या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे पत्र परिषदेत संयोजक डॉ. राजेश गुप्ता व अध्यक्ष डॉ. ओ एन मुखर्जी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
पाण्याची शाश्वतता आणि अधिक लवचिक न्याय्य जग घडवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी संवाद पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स 2024 चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अमेरिका, सिंगापूर, दुबई, इंग्लंड आणि इंडियाचे येथील मान्यवर येणार आहे. आणि पाणी आणि शाश्वत विकास 2024, अंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शन करणार आहेत असे सांगितले.
पाण्याची शाश्वतता आणि अधिक लवचिक न्याय्य जग घडवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी संवाद पुढे नेण्यासाठी पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांसाठी अधिक शास्वत आणि समृद्ध भविष्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स 2024 चे आयोजन केले आहे. या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स 2024 मध्ये देश – विदेशातून 600 प्रतिनिधींची उपस्थिती राहील. असे सुद्धा त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपस्थित अध्यक्ष सचिव व संयोजक यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. ओ एन मुखर्जी, डॉ. राजेश गुप्ता, डॉ. ईशा खेडीकर व मंचावरील उपस्थित अनिरुद्ध देशपांडे, नरेंद्र बांगरे, डॉ. राहुल राळेगावकर यांची उपस्थिती होती.