सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी भिम जयंती कार्यक्रम

नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीच्या अनुषंगाने शुक्रवार २१ एप्रिल २०२३ रोजी सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये कर्मचारी वृंदांच्या वतीने जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सीजीओ कॉप्लेक्स ब्लॉक बी, पार्कींग परिसरात दुपारी २ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रदीप कुमार दीक्षित भूषवितील. मुख्य अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत, प्रसिद्ध लेखक प्रा. जावेद कुरेशी (पाशा) व एनएसएसओ, एफओडी चे उपसंचालक जनरल आर.सी. गौतम यांची उपस्थिती असेल.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष जीएसटी सहायक आयुक्त संजय थुल, समितीचे सचिव एनएसएसओ डीपीसी डॉ. अनमोल टेंभुर्णे, उपाध्यक्ष आशा सुटे, कोषाध्यक्ष तारुलता मेश्राम (झोडापे), सदस्य, मीनाक्षी जांगडे, राजू भगत आदी परिश्रम घेत आहेत.

कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री ने नई पैसेंजर ट्रेन के लिए गोंदिया वासियों को शुभकामनाएं दीं

Thu Apr 20 , 2023
नई दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने जबलपुर-गोंदिया-जबलपुर के बीच चलने वाली एक नई पैसेंजर ट्रेन के लिए गोंदिया वासियों को शुभकामनाएं दी हैं। सुनील मेंधे के एक ट्वीट के जवाब में, प्रधानमंत्री ने कहा; “बहुत-बहुत शुभकामनाएं! जबलपुर और गोंदिया के बीच यह नई ट्रेन एक बड़ी सौगात है, जिससे लोगों का सफर सुरक्षित और सुविधाजनक होगा।” Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com