– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेसह विविध लोकार्पण संपन्न
नागपूर :- पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन नागपूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी झालेल्या कार्यक्रमात रुग्णवाहिका, कार्डीयाक रुग्णवाहिका, आंतररुग्ण रुग्णवाहिका, मनपासाठी रस्ते स्वच्छ करणाऱ्या रोड स्वीपींग मशीनचे आज लोकार्पण करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या वतीने प्राप्त एकूण ९ नवीन रुग्णवाहिका जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा ता. भिवापुर, प्रा.आ.केंद्र कान्होलीबारा तालुका हिंगणा, प्रा.आ.केंद्र तितुर तालुका कुही, प्रा.आ.केंद्र साळवा ता कुही, प्रा.आ.केंद्र बोरखेडी तालुका नागपूर, प्रा.आ.केंद्र मेंढला तालुका नरखेड, प्रा.आ.केंद्र डोरली तालुका पारशिवनी, प्रा.आ.केंद्र साटक तालुका पारशिवनी, प्रा.आ.केंद्र भांडारबोडी तालुका रामटेक या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
15 व्या वित्त आयोगातुन पालिका स्वच्छता विभागात 4 आधुनिक पध्दतीच्या रोड स्वीपींग मशीन खरेदी करण्यात आल्या असुन या मशीनव्दारे स्वच्छता केल्याने हवेतील प्रदूषण कमी होण्यास तसेच कच-याच्या ढिगार्याशी मनुष्यबळाचा वापर व हाताळणी न करता कमी वेळेत अधिक रस्ते स्वच्छ होणार आहेत
जिल्हा सामान्य रुग्णालयास आकस्मिक रुग्णांच्या उपचाराकरीता आवश्यक असलेले संपुर्ण अत्याधुनिक उपकरणासह एडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहीका जिल्हा वार्षीक योजना सन 2023-2024 अंतर्गत खरेदी करण्यात आली असुन आजपासून तत्काळ आरोग्य सेवा देण्यास उपलब्ध झाली आहे.
रुग्णसेवेच्या दर्जात वाढ होण्यासाठी जिल्हा वार्षीक योजना सन 2023-24 अंतर्गत येणा-या नागपूर जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय कामठी, ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर काटोल, हिंगणा व मौदा येथे सुसज्ज मॉडयुलर शस्त्रक्रियागृह व प्रसुतिगृह नागरीकांच्या सेवेत असणार आहे.
लोकार्पणप्रसंगी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, सर्व सन्माननीय विधानसभा व विधान परिषद सदस्य, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.