संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आझाद हिंद सेनेचे संस्थापक व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्य सुनिता भौमिक होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विश्वनाथ वंजारी व प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सुधीर अग्रवाल उपस्थित होते.
याप्रसंगी उपप्राचार्य सुनिता भौमीक यांनी महिलांना सशक्त करण्यात सुभाष चंद्र बोस यांनी महत्त्वाची कामगिरी केल्याचे मत व्यक्त करत आर्मित महिलांना सर्वप्रथम स्थान सुभाष चंद्र बोस यांनीच दिले एवढेच नव्हे तर महिलांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देखील दिल्याचे त्यांनी स्पष्टकेले. तर प्रमुखं अतिथी म्हणून प्रा विश्वनाथ वंजारी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांचे योगदान होते, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव पहिल्या ओळीत आहे. सुभाषचंद्र बोस यांनी भारतासाठी पूर्ण स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने केली आणि त्यामुळे नेताजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजी शासनाचा पाया हादरवून टाकला होता, असे मत व्यक्त केले. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ सुधीर अग्रवाल यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमांचे आयोजन व संचालन प्रा ज्ञानेश्वर रेवतकर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार प्रा पंकज वाटकर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.