पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

सातारा  :- पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजभवन, महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा येथे पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर (मरळी), ता. पाटण परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली.

दौलतनगर येथील विकास कामाची पाहणी करण्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांना निमंत्रण दिले. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून 27 हजार लाभार्थ्यांना लाभ दिला असून राज्यातही शासन आपल्या दारीचा सातारा पॅटर्न राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com