नागपूर :- महावितरणच्या नागपूर शहर मंडला अंतर्गत असलेल्या नागपूर शहर, हिंगणा व बुटीबोरी येथील औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज पुरवठा, वीज क्षमता वाढ व वीज पुरवठा तक्रारीचे तातडीने निराकरण होण्याच्या दृष्टीने गड्डीगोदाम येथील महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ येथे स्थापन करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचे उद्घाटन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते नुकतेच करण्यत आले.
बुटिबोरी मॅन्युफ़ॅक्टचरींग असोसिएशनचे राकेश सुराणा, पुनीत महाजन एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन, हिंगणाचे संदीप तिवारी, प्रदीप निकम, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे नवीन मल्लेवर, नाग विदर्भ चेंबर ऑफ़ कॉमर्सचे फारुक़ अकबानी या औद्योगिक ग्राहक संघटना प्रतिनिधी व औद्योगिक वीज ग्राहक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत कक्ष स्थापित करण्याचे प्रयोजन सांगतांना सर्व वीज ग्राहकांना तत्परतेने सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. यावेळी नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे उपस्थित होते, यावेळी औद्योगिक वीज ग्राहकांच्या समस्ये वर चर्चा करण्यात आली.
या कक्षाच्या अध्यक्ष कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रतीक्षा शंभरकर असून सदस्य म्हणुन वरिष्ट व्यास्थापक (वित्त व लेखा) प्रशांत ठाकरे, उपकार्यकारी अभियंता आतीया हुसैंन, स्वाती फ़ाटे आणि भावना फ़ुरसुले या आहेत. नागपूर शहर, हिंगणा व बुटीबोरी येथील औद्योगिक ग्राहकांनी नवीन वीजजोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा इतर संबंधित प्रश्न 7875760008 या मोबाईल क्रमांकावर अथवा swagatcell_nagpuru@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर कळविण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.