महा.अनिस हिगणा शाखेचा अभिनव उपक्रम

– आकाश राऊत

नागपुर – महा.अनिस च्या हिंगणा शाखेनी होळी चे निमित्त साधुन “होळी लहान करा आणि पोळी दान करा” या उपक्रमा अंतर्गत होळी चे पुजन करतांना होळीत अर्पण करणाऱ्या पुरणपोळ्या, नारळं, साखरेच्या गाठ्या व इतर खाद्यपदार्थ गोळा करुन झोपडपट्टी तील अनाथ व भटके कुटुंबांमधे वितरीत केले.

या अनोख्या उपक्रमात महा. अनिस च्या कल्पना लोखंडे व निलिमा गोबाडे व शाखा कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत हिंगणा परिसरात होळी जाळणाऱ्या परिवारांना भेट देऊन वरील खाद्यपदार्थ होळीत न जाळता झोळीत दान करण्याची विनंती केली.या कामी संध्या राऊळकर व शिल्पा वीर यांनी सुद्धा मदत केली .
आज हिगणा झोपडपट्टी एरीयात एका छोटेखानी कार्यक्रमाअंतर्गत या पुरणपोळ्या व खाद्यपदार्थ गरीबांना वितरीत केले.
या वेळी महा. अंनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे व राज्य सदस्य विजयाताई श्रीखंडे , नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम,दिपक लोखंडे व सुरेश गोबाडे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

Sat Mar 19 , 2022
संदीप कांबळे,कामठी -होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच कामठी ता प्र 19:-मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटामुळे सन समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर निर्बंध होते .गर्दी टाळण्यासाठी चार पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असल्याने होळी सारख्या रंगाचा उत्सवही निरुत्साहीपणे साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी होती.शिथिल झालेल्या कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षांची मरगळ झटकून नागरिकानी होळी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights