नागपूर :- महानगरपालिका, नागपूर आणि बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिका श्री 2025 शरीर सौष्ठव स्पर्धा” रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी “श्री शरीर सौष्ठव स्पर्धा” सरदार वल्लभभाई पटेल (कच्छी विसा) मैदान, नागपूर येथे संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद पेंडके, माजी नगरसेवक, नरेन्द्र (वाल्या) बोरकर, माजी नगरसेवक तथा क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, धूल, सहा. आयुक्त, लकडगंज झोन, जितेन्द्र गायकवाड, क्रीडा विभाग तसेच असोसिएशनचे पदाधिकारी अभिषेक कारीगवार, दिनेश चावरे, प्रितम पाटील, टिकू शिदे, यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. पुरस्कार बितरण सोहळ्यात “महानगरपालिका श्री 2025” विजय भोयर (अमरावती) यांना 51,000/- रु. रोख व चषक तसेच बेस्ट पोजर उमेश भाकरे (अकोला) यांना 31,000/- रु. रोख व चषक देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक वजन गटात प्रथम स्थानासाठी रु. 20,000/-, दुस-या स्थानासाठी रु. 15,000/-, तिस-या स्थानासाठी रु. 10,000/- चवत्या स्थानासाठी रु. 7,000/- तसेच पाचव्या स्थानासाठी रु. 5,000/- पुरस्कार प्रदान करण्यात आले.