नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवार ३ फेब्रुवारी रोजी, प्रदेश सचिव आनंदसिंह तथा नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर तसेच संपूर्ण कार्यकर्तासह जिल्हासह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव साहेबांना भष्ट्राचार थांबविण्या संदर्भात नगर परिषद वाडी व गोदनी नगर परिषद निवेदन देण्यात आले.
दोन्ही नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार करुन नकाशे व बांधकाम मंजुर करण्याचे अवैधरित्या काम सुरु आहे. याबाबत त्यांच्या विरोधात मागणी करण्यात आली आहे. तसेच नोंदणी विभाग नागपूर ग्रामीण व शहर यांच्या सह जिल्हा निबंधक यांना निवेदन देण्यात आले की, गावठान प्रमाण पत्रावर अवैध रजिस्ट्री करण्यात येत आहे.
त्यामध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी निवेदनाद्वारे भ्रष्टाचार थांबले नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी के प्रदेश सचिव के अधिकारी व कार्यकर्ते बालू पाटील, रितेश लक्केवार, नेलॉर्ड डेविड, रुषी बोराटे, मंगल राऊत, रामा काटकर, लोकेश पुरोहित, मिश्राजी, शिशुपाल उमाळे, भाऊराव वासनिक, समिर पठान, संतोष गुप्ता, रवि विश्वकर्मा अमित पाल, ऊमेश काटकर, जय, विशाल जोशी, दादु, राजेश माटे, रंजित मेश्राम, इत्यादी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.