नागपुर :- जिल्हा शिवसेने तर्फे संपूर्ण जिल्यात संक्रातीनिमित्य हळदी कुंकु चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जिल्यातील महिलांच्या सोबत संवाद साधुन त्यांचेशी चर्चा व प्रश्न समजवून घेण्याचे कार्य सातत्याने रेवती कृपाल तुमाने करत आहेत.
नुकताच, शिवसेना महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी अक्षय भवन नंदनवन येथे भव्य हळदी कुंकचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन सहाजिकच रेवती कृपाल तुमाने उपस्थित होत्या या कार्यक्रमात मोठया संख्येने महिलांनी आपली उपस्थिती लावली व रेवती कृपाल तुमाने यांनी सर्व महिलांशी संवाद साधुन आपुलकीने सर्वाच्या मंगल कामना विषयीची चर्चा केली होती. या भव्य कार्यक्रमात प्रामुख्याने शिवसेनेच्या मुख्य पदाधिकारी, मनिषा पापडकर,रुपाली बोकडे,नलिनी बोकडे, कविता विश्वकर्मा,शिल्पा धोटे,मीना जालेकर, राजश्री इंगळे, लता बर्डे, पिकी काकडे,गायत्री वैद्य, मनिषा परड, आशा साठवणे, किरण दवंडे, प्रिती श्रीरामे, पूनम सांगडे, मंजुषा पाणबुडे, सीमा पारधी, यांचेसह असंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.