लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशनचा उपक्रम
सावनेर : नागपूर ग्रामीण पोलीस विभागामार्फत सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्याने विविध लोकजागृती व कृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक लायन्स क्लब आणि पोलीस ठाणे तर्फे क्षेत्रातील चालक, वाहक आणि वाहतूक संबंधित व्यक्तींसाठी नेत्र, शुगर, रक्तचाप सारख्या चाचण्या व तपासणी शिबिराचे नुकतेच पोलीस स्टेशन सभागृहात आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री अनिल म्हस्के (भा. पो. से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी भूषविले. श्री रवींद्र मानकर, पोलीस निरीक्षक व प्रा. डॉ. विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवास्यांच्या जीवाची पर्यायाने कुटुंबाची जबाबदारी ही चालक वाहकांवर अवलंबून असते त्यामुळे त्यांनी तसेच सामान्य जनतेने सुद्धा वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असे प्रतिपादन रवींद्र मानकर यांनी केले. अनिल म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनात सरकारी किंवा खाजगी वाहतूक क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींनी नियमित नेत्र, शुगर, रक्तचाप तपासन्या करून योग्य औषधोपचार केल्यास अपघातांचे प्रमाण काहीसे कमी होऊ शकते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा उद्देश व प्रास्ताविक प्रा. विलास डोईफोडे यांनी स्पष्ट केले. सदर शिबिरात डॉ. शिवम पुनियानी, रुकेश मुसळे आणि आस्था पथालॉजि लॅब चमू यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून उपरोक्त तपासन्या सुद्धा केल्या. कार्यक्रमाचे संचालन व्यंकटेश दोनोडे तर आभारप्रदर्शन वत्सल बांगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील तलमले, किशोर सावल, सुरेंद्र वासनिक, पंकज गजभिये, रुपेश जिवतोडे, शशांक देशमुख, अंकुश शास्त्री, ज्योती नेवारे यांनी परिश्रम घेतले. अनेक वाहन चालक, वाहकांनी शिबिराचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले.