मंदिरांचे रक्षण, जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी नागपूर येथे ४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत) !

नागपूर :- मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. तरी मंदिरांचे रक्षण, जतन, संवर्धन करण्यासठी आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्रीराम मंदिर, राम नगर, श्री गणेश मंदिर टेकडी, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी, श्री गुरु बृहस्पती मंदिर, कान्होलीबारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 4 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीराम सभागृह, राम नगर, नागपूर येथे “महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत)” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदु जनजागृती समिती तथा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा निमंत्रक  दिलीप कुकडे पुढे म्हणाले, ‘‘या परिषदेला नागपूर तसेच विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातुन २५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनिल घनवट, प्रदीप तेंडुलकर- अध्यक्ष, जीवदानी माता मंदिर, विरार, गणेश कवडे- अध्यक्ष, विघ्नहर अष्टविनायक मंदिर, ओझर, दिलीप देशमुख- माजी धर्मादाय आयुक्त, पू. रामज्ञानिदास महात्यागी- महात्यागी सेवा संस्थान, तिरखेडी, पू. भागीरथी महाराज- गुरुकृपा सेवा आश्रम, सर्पिधाम, बेलतरोडी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या वेळी सुनील घनवट- समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दिलीप कुकडे- नागपूर जिल्हा निमंत्रक महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि अध्यक्ष संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेल्लोरी, अधिवक्ता ललित सगदेव- विश्वस्त प्राचीन शिवमंदिर मानकापूर, महादेवराव दमाहे- उपाध्यक्ष हिल टॉप दुर्गा माता मंदिर, प्रदीप पांडे प्रमुख पुजारी हिल टॉप दुर्गा माता मंदिर हे उपस्थित होते.

या मंदिर अधिवेशनात विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होईल तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’ द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. तसेच दुसरी राज्य स्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ 11 महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ 6 महिन्यांत 414 हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून सहभागी होण्यासाठी आणि याविषयी अधिक माहितीसाठी 9011084450 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.’

NewsToday24x7

Next Post

डॉ. कमला मोहता विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन नागपुर के लिए नियुक्त

Wed Jan 31 , 2024
नागपुर :- महाराष्ट्र शासन द्वारा डॉ कमला मोहता को नागपुर शहर के लिए विशेष कार्यकारी अधिकारी पद पर नियुक्त किया गया। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल, नागपुर विभाग द्वारा प्रजासत्ताक दिन पर आयोजित एक समारोह में उन्हें सम्मानित करते हुए परिचय पत्र सौंपा गया। इस अवसर पर नंदलाल राठोड, सहायक आयुक्त, कामगार कल्याण मंडल नागपुर विभाग, डॉ. रवि गिरहे, अध्यक्ष विदर्भ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com