संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25:-आझादी का ७५ अमृत महोत्सवाअंतर्गत ऊर्जा विभाग महावितरण नागपूर द्वारा संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन वडाेदा ता. कामठी जि. नागपूर येथे आयोजित ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाधिकारी नागपूर आर विमला , योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, दिलीप दोडके मुख्य अभियंता महावितरण, उपजिल्हाधिकारी शिवराज पडाेळे,जी प सदस्य अवंतिका लेकुरवाडे याच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या हस्ते साैर उर्जा लाभार्थी व स्वातंत्र्य सेनानी यांचे नातेवाईकांचे सत्कार कारण्यात आले. यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रधानमंत्री . नरेंद्र माेदीजी यांनी आझादी का ७५ अमृत महाेत्सव ही संकल्पना अमलात आणुुन विविध विभागाद्वारे आझादी का ७५ अमृत महाेत्सव अंतर्गत जनजागृती करत असल्याबाबतचे आभार मानले.