नागपुर गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई ; 9 लाख 77 हजार रु च्या एमडी ड्रग्ज पावडरसह चार जण गजाआड

नागपुर – ड्रग्सचा जीवघेणा धंदा करणाऱ्यां विरोधात नागपुर गुन्हे शाखा पोलिसांनी चांगलीच मोहीम उघडली आहे. ज्यात चार आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून 53 ग्रॅम 100 मिली ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) ड्रग पावडर नावाचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या एमडीची बाजारात तब्बल 5,31,200/- एवढी किंमत सह इतर एकुण 4,46,000/- रूपयाचा असा एकुण 9,77,200/-रू.चा मुद्येमाल जप्त केले आहे आहे.

प्राप्त माहिती नुसार दिनांक 02/07/2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपुर शहर यांनी गुप्त माहीती मिळाल्या वरून पो.स्टे. वाडी हद्दीत अमरावती कडुन नागपूरकडे येणाÚया रोडवर यादव धर्मकाटा समोर, वडधामना, नागपुर येथे सापळा रचून पांढÚया रंगाची कार ताब्यात घेतली. कारमधील दोन इसम 1) आशिष गुलावराव कावळे, वय 31 वर्श, रा. मिनीमाता नगर, प्लॅाट नं. 279 पाचझोपडा, गल्ली नं. 14, पो.स्टे. कळमना, नागपूर 2) भावेश मोतीलाल दसारे, वय 32 वर्श, रा. डिप्टी सिग्नल, साखरकर वाडी, अल्तमस मस्जीद जवळ, पो.स्टे. कळमना, नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातुन 27 ग्रॅम 520 मिली ग्रॅम एम.डी. ड्रग्स् पावडर कि. 2,75,200/-रू व विविध कंपनीचे 04 मोबाईल कि. अं. 31,000/-रूपये, नगदी 5000/-रूपये व डंतनजप त्पज्र पांढÚया रंगाची कार क्र. डभ् 31 क्ट.8402 किंमत 3,00,000/-रू. असा एकुण 6,11,200/-रू चा मुद्येमाल मिळून आल्याने नमूद आरोपीवर पो.स्टे. वाडी येथे कलम 8(क), 22(ब), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आले असुन दिनांक 06/07/2022 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे.
दिनांक 04/07/2022 रोजी मिळालेल्या माहिती वरून पो.स्टे. पाचपावली हद्दीत आसीनगर चौकात, आरोपी नामे 1) सोहेल खान वल्द सलीम खान वय 19 वर्श, रा. तुमडीपूरा, सौदागर बाबा दर्गा मागे, सोनार ओली, कामठी, पोलीस स्टेशन जुनी कामठी नागपूर 2) मोहम्मद अल्तमस वल्द मोहम्मद अरशद, वय 19 वर्श, रा. पिवळी हवेली, रब्बानी शाळे जवळ, पोलीस स्टेशन जुनी कामठी, नागपूर यांना ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्यांचेकडुन 25 ग्रॅम 600 मिली ग्रॅम एम.डी. ड्रग्स् पावडर कि. 2,56,000/-रू व विविध कंपनीचे 02 मोबाईल हॅण्डसेट एकून कि. 60,000/-रू. तसेच टी.व्ही.एस ज्युपीटर कंपनीची टूव्हीलर कि.अं. 50,000/-रू. असा एकुण 3,66,000/-रु.चा मुद्येमाल मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. पाचपावली विरूध्द कलम 8(क), 22(ब), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळया कारवाईत चार आरोपीकडुन एकुण 53 ग्रॅम 100 मिली ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) ड्रग पावडर किं. अं. 5,31,200/-रूपये व इतर एकुण 4,46,000/- रूपयाचा असा एकुण 9,77,200/-रू.चा मुद्येमाल जप्त केला आहे.
वरिल कामगिरी नागपुर शहराचे अपर पोलीस आयुक्त  (गुन्हे) नविनचंद्र रेड्डी,  पोलीस उप-आयुक्त, (डिटेक्षन)  चिन्मय पंडीत, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडीत, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सपोनि अरूण बकाल, उमेश नासरे, बद्रीनारायण तांबे, पोहवा प्रमोद धोटे, समाधान गिते, परमेश्वर कडु, नापोअं विनोद गायकवाड, नारायण पारवेकर, सुशील गवई, मनोज नेवारे, पोअं सहदेव चिखले, सुभाष गजभिये, मंगेशमापारी, राहुल पाटील, नितीन साळुंके, मनापोअं अनुप यादव गुन्हे शाखा, यांनी केली आहे.

Next Post

श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांचा सत्कार

Tue Jul 5 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया निवडणूक -२०२२ मध्ये श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विजयी झाले, त्याकरिता श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी च्या वतीने संस्थेच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. Your browser does not support HTML5 video. असोसिएशन ऑफ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com