– “टीचर्स डे स्पेशल” सुगम संगीत कार्यक्रम
नागपूर :- शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, शिक्षिका यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुगम संगीताचा होत असलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. दरवर्षी शिक्षक दिनी सुमधुर गीतांच्या अशाच सरी ज्ञानामृताच्या रूपाने बरसत राहतील, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्वरधारा म्यूझिकल ग्रूप, नागपूर द्वारा “टीचर्स डे स्पेशल” सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३ ला अमृत भवन, सीताबर्डी, नागपूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, राजू मोहोड, सचिन इंगोले, संयोजक प्रमोद अंधारे आणि प्रविण भिवगडे, महाराष्ट्राचे किशोर कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले सागर मधुमटके, हार्मनी इव्हेंट्सचे राजेंद्र समर्थ, कैलाश तानकर, परिनिता माथुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, ज्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदोदित कार्यरत असतात. अगदी तसेच आम्ही सर्वांनी शिक्षकांमधील सुप्तकलागुण संपन्नता वृध्दींगत होण्यासाठी प्रयत्नशील राहणे अतिशय गरजेचे आहे, याकरिता मी माझ्या शिक्षक बांधवांच्या सोबतीला असून नेहमीच सहकार्य करीत राहील. “जुनी पेन्शन योजना” लागू होईपर्यंत मी शांत बसणार नाही, असे आश्वासन सुद्धा अडबाले यांनी यावेळी शिक्षक बांधवांना दिले.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सहभागी सर्व शिक्षक, शिक्षिका यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. “स्वरधारा” ही संस्था नागपुरातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, शिक्षिका यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य मागील काही वर्षांपासून करीत आहे.
याप्रसंगी डॉ. अमृता सिंघम, डॉ. मानसी कान्हे, अश्विनी शिलेदार, दिप्ती अय्यर, डॉ. अमृता साखरवाडे, डॉ. स्वाती जोशी, वैशाली प्रयागी, कल्याणी नासरे, प्रा. सुनिता बोरघाटे, सुनिता गुंफेकर, पुनम भगत, डॉ. प्रतिभा दातीर, हेमा कावरे, हेमलता सलामे, सुजाता अली, डॉ. नीतू गुप्ता, कविता बागडे तसेच प्रा. सर्वेश्वर कासरला, डॉ. सुशील गडेकर, मकरंद बक्षी, डॉ. अश्लेष मुरकुटे, प्रा. नितीन जोशी, प्रा. संजीव सराफ, प्रा. चंद्रशेखर इंगळे, डॉ. विजय खवले, किशोर उरकुडकर, विजय इंगळे, सुनिल रोडे, प्रा. श्रीकांत कोडापे, प्रा. राज मालेवार, राजेश धुंदाड आणि वीरेंद्र गुंफावार, नितीन भोळे, डॉ. अरविंद काळे, प्रा. खुशाली कोडापे, राजेंद्र नांदुरकर, अल्का लाडे, तुषार रंगारी आणि मनोज पुरी यांनी सुंदर गीते सादर केली. या संपुर्ण कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य राजू देशपांडे यांची असून रीना पुरी यांनी संचालन केले.