आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय –  प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार

अमरदिप बडगे 

गोंदिया – आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या भविष्यवेधी जागतिक दर्जाचे शिक्षण प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रकल्प अधिकारी विकास राज्यवार यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच माझे ध्येय असून जोपर्यंत आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,व अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे  यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भविष्य वेधी शिक्षण प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे काल दि.२०/६/२०२२ ला तीन दिवसीय भविष्य वेधी शिक्षण प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले,हा प्रशिक्षण आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्याच्या वेळी उद्घाटनप्रसंगी उद्घाटक आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त  दशरथ कुळमेथे म्हणाले की “आदिवासी विद्यार्थ्यांचा उद्धार व उत्थानासाठी शिक्षकांनी आपले सर्वस्व पणाला लावून अध्यापन करणे अत्यंत गरजेचे आहे, त्याप्रमाणे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष रविवारी भेट देऊ घेऊन असे आव्हान केले की आदिवासी विद्यार्थी हा जागतिक स्तरावर आपले नाव लौकिक करून डॉक्टर,इंजिनीयर,प्रशासकीय अधिकारी,शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी अशा विविध क्षेत्रात जोपर्यंत उत्तुंग भरारी मारत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असे आवाहन प्रशिक्षण घेत असलेल्या शिक्षकांना केले, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गोंदिया च्या महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम म्हणाल्या की मी सुद्धा शासकीय आश्रम शाळेतील शिक्षिका होती व आदिवासी विद्यार्थी हे देशाच्या विकासाचे केंद्रबिंदू असून त्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच देशाचा विकास असे उद्गार काढून आपल्या आश्रमशाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
भविष्यवेधी प्रशिक्षणात एकूण 151 शिक्षक, ९ सुलभक उपस्थित असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष सोनवणे,सौ रमा मिश्रा,अरुण सूर्यवंशी प्रकल्पातील मुख्याध्यापक प्रभू कळंबे, प्रभाकर चोपकर,अरुण राऊत, देविदास कठाणे,मदन भोवते, हरिभाऊ किरणापुरे, एकनाथ दुबे,प्रशांत गिरी,नरेंद्र भाकरे इत्यादी व विजय मेश्राम,नरेंद्र पाळेकर, गाते,  बोकडे, भुसारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर येथील विशेष प्रशिक्षक म्हणून  सपना मानकर,प्रतिभा गोहने, दीपक आंबुलकर, राजेश माहुलकर हे देवरी प्रकल्पातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देत असून या प्रशिक्षणाचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी केले असून सूत्रसंचालन कु.दुर्गा लांजेवार व आभार प्रदर्शन  सी ए पटले यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकसहभागातून ग्रामविकास साधता येतो-सरपंच बंडू कापसे

Wed Jun 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 22 :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या असून गाव परिसराचा कायापालट , विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे असे आवाहन कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायत चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!