अनोळखी तरुणीची गळा चिरून हत्या..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सुरादेवी गावातील रेल्वे क्रॉसिंग जवळील 50 मीटर अंतरावर एका अनोळखी 20 वर्षीय तरुणीचा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 च्या सुमारास निदर्शनास आली असून मृतक तरुणीची ओळख अजूनही पटली नसून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून सदर घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आज दुपारी 2 च्या सुमारास सदर घटनास्थळ परिसरात गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्यांना ही घटना कळताच बातमी हवेसारखी पोहोचली .यासंदर्भात घटनेची महिती कोराडी पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले आहे.

मृतक तरुणीच्या शरीरावर अंगात लाल टी शर्ट व काळी लैगिज परिधान केलेली आहे,।सदर खून प्रकरणात विविध तर्क वितर्क लावले जात असून पोलीस कसोशीने शोध घेत आरोपीला शोध लावून घटनेचे रहस्य उघडकीस आणण्यासाठी पोलीस सक्रिय झाली असली तरी सदर खून प्रकरणात प्रेमप्रकरणातून घातपात झाला असल्याचा तर्क लावण्यात येत आहे.तर संबंधित पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ला आलेल्या मिसिंग चा ताळमेळ बसविण्यात व्यस्त झाले आहेत.सदर घटनेसंदर्भात कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दुष्काळ पीडीत शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Sat Aug 20 , 2022
  कृषीमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी नागपूर  : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर ग्रामीण मधील मौजा पांझरीलोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com