शहरात एकुण ३४४९ गणेश मुर्तींचे कृत्रीम कुंडात विसर्जन

– ९० कुटुंबीयांनी घेतला फिरत्या विसर्जन कुंडांचा लाभ

चंद्रपूर :- गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यानंतर दीड दिवस व पाच दिवस मिळुन एकूण ३४४९ श्रीगणेश मुर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रीम विसर्जन कुंडात झाले आहे.

यात झोन क्र. १ (अ ) अंतर्गत ८१९, झोन क्र. १ (ब ) अंतर्गत २९०, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत – ११९५, झोन क्रमांक २ (ब ) – ४२२ , झोन क्र. ३ (अ) – २८०, झोन क्रमांक ३ (ब ) येथे – ४४३ अश्या एकुण ३४४९ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन शहरात आतापर्यंत झाले आहे. घरघुती व लहान आकाराच्या मुर्तींचे विसर्जन हे शक्यतोवर घरीच करावे, घरी करणे शक्य नसल्यास मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या कृत्रीम कुंडात करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले होते.

२६ कृत्रीम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी मनपाद्वारे करण्यात आली असुन सदर विसर्जन कुंड सुस्थितीत राहावे यासाठी स्वच्छता विभागाचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. या कृत्रीम कुंडास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर मुर्तींचे विसर्जन येथे केल्या जाते तेव्हा पाणी गढुळ होऊन मोठ्या प्रमाणात माती जमा होते. मुर्ती पूर्णपणे विसर्जित झाल्यावर या कुंडांची स्वच्छता केल्या जाते व नवीन पाणी सोडण्यात येते जेणेकरून स्वच्छ पाण्यात मुर्तींचे विसर्जन केल्याचा आनंद नागरीकांना मिळावा.

गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ३ ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे नागरीकांच्या सोयीस देण्यात आलेले आहेत. या उपक्रमासही प्रतिसाद लाभुन ९० गणेश मुर्तींचे विसर्जन यात करण्यात आले आहे. यादरम्यान शहरात एकही पीओपी मुर्ती विसर्जनादरम्यान आढळुन आलेली नाही त्यामुळे मनपाचे पीओपी मुक्त गणेशोत्सव अभियान यंदाही यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायिक मागण्यांच्या हक्कासाठी उमेश भोकरेचे मोबाईल टॉवर वर विरुगिरी

Mon Sep 25 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने कामठी शहराच्या विविध प्रलंबित व रखडलेल्या आवश्यक मागण्यांना पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौकात साखळी उपोषण पुकारले आहे.या बेमुद्दत साखळी उपोषण अंतर्गत अर्धनग्न आंदोलन केले त्यानंतर लोटांगण करीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले उपोषण करून आजचा 15 दिवस राहूनही प्रशासनाकडून कुठलेही दखल घेण्यात आली नव्हती यावर प्रशासनाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com