संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन मध्ये आयोजित लग्न समारंभात आपल्या परिवारासह सहभागी व्हायला गेलेल्या महिलेच्या बॅग मधून अज्ञात चोरट्याने 12 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना 25 मे ला सायंकाळी 5 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी रंजना बागडे रा रिपब्लिकन नगर ,नागपुर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.