मनसे सैनिकांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार

– अपघाती रुग्ण सेवा व समाजकार्यासाठी करण्यात आला सत्कार

रामटेक :- अपघाती रुग्णसेवा व उत्तम असे समाजकार्य बजवल्याने मनसर येथील काही मनसे सैनिकांचा नुकताच रामटेक पोलिस प्रशासणातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

मनसे हा सामाजीक कार्यासाठी धाऊन जाणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. याच प्रेरणेतून मनसर येथील मनसे सैनिक रॉकी चवरे व त्याचे मित्र सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. रामटेक व मनसर परिसरात कुणाचा अपघात झाल्यास व त्या अपघाताची माहीती मिळताच रॉकी चवरे व त्याचे मीत्र हर्ष ढगे, मुकेश भोंडेकर, निखिल बोरीकर, अविनाश बागडे, दानिश अंसारी व इतर सहकारी मनसे सैनीक घटनास्थळी पोहचुन अपघाती रुग्णांना आवश्यक सहाय्य करतात. ही मुलं असे कार्य सतत करत असल्याने त्याची दखल घेत रामटेक पोलीस प्रशासनाच्या वतीने रामटेक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित पांडे यांनी नुकताच दि. १९ जुलै ला यासर्व मनसे सैनिकांचा पोलीस स्टेशन रामटेक येथे जाहीर सत्कार केला. यासाठी मनसे तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांनी यासर्व मनसे सैनिकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार 

Sat Jul 22 , 2023
नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्य “सेवा दिन” साजरा करताना आज झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा भाजप प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सत्कार केला. ह्यावेळी भटक्या विमुक्त जाती मोर्चा शहराध्यक्ष किशोर सायगण, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, बूथप्रमुख विक्रम डुमरे, मौसमी वासनिक, राम सामंत उपस्थित होते . ह्यावेळी गुणवत्ताप्राप्त विध्यार्थी आलोक किशोर थेटे, ऐश्वर्या नरेश वंजारी, इशिका सुनील कापसे, कुश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!