आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा समारोप संपन्न

नागपूर :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत ” आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2023 ” च्या पहिल्या बॅचचा समारोप आज डॉक्टर विपिन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा आयोजित प्रथम बॅच चा शुभारंभ दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रथम बॅचचा आज दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी समारोप समारंभ संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हे प्रशिक्षण झाले म्हणजे अपदा मित्र आणि प्रशासनाचा यापुढे आयुष्यभर प्रशासनासोबत संबंध राहणार आहे ते पुढे म्हणाले की , सर्व आपदा मित्र आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तत्पर सेवा देतील, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आपत्तीचे प्रमाण भविष्यात निश्चितच कमी होतील असा विश्वास व्यक्त केला. अंकुश गावंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपदा मित्र या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविक सादर केले. या प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 108 युवक युवती प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला होता. दहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पर्यावरण, लाइफ सेविंग, अग्निशमन ,प्रथमोपचार, शरीर विज्ञान त्यासोबतच विविध प्रकारच्या आपत्तीबाबत तसेच त्यांच्या व्यवस्थापनाबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाज्योती मार्फत पोलीस- सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

Sat Jan 21 , 2023
नागपूर : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि.25 जानेवारी 2023 आहे. पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com