मित्राला उधारीचे पैसे मागण्यास गेलेल्या इसमावर धारदार शस्त्राने मारून केले गंभीर जख्मी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं ३ येथे उधारीचे पैसे आपल्या मित्राला मागण्याकरीता लोकेश गुप्ता यांच्या दुकानावर गेलेल्या संतोष ठाकुर ला दोन आरोपींनी धारदार शस्त्राने कमरेवर मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरो पीचा शोध घेत आहे.

बुधवार (दि.२६) ऑक्टोंबर ला मध्यरात्री श्री संतोष रामविलास ठाकुर वय ३६ वर्ष राह. खदान नं. ३ हवामहल हा आपले उधारीचे पैसे त्याचा मित्र तेज प्रकाश याला मागण्या करीता लोकेश गुप्ता यांच्या दुकानावर गेला असता तो तिथे दिसला नाही म्हणुन तिथे उभे असलेले १) सोहेल खान वय २५ वर्ष, २) रोहित दोन्ही राह. कन्हान यांना विचारले की येथे दुका नावर काम करणारा तेजप्रकाश नाही दिसत आहे. तो कोठे बाहेर गेलेला आहे काय ? असे विचारले असता आरोपीतांनी हम लोग इसी काम के लिये यहा खडे है क्या ? असे म्हणुन सोहेल खान यांनी संतोष ठाकुर ला दोन थापडा मारून शिवीगाळ करित त्याच्या कमरेवर धारधार शस्त्राने कमरेत ३ घाव मारून गंभीर जखमी करून दुखापत पोहचविली. सदर प्रकरणी फिर्यादी संतोष ठाकुर यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात आरोपी १) सोहेल खान ,२) रोहित या दोघा विरुध्द पोस्टे कन्हान येथे गुन्हा दाखल करून गुन्हयाचा पुढी ल तपास पो हवा खुशाल रामटेके, मंगेश ढबाले हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com