गृह मतदानासाठी अधिकारी मतदारांच्या घरी

गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 12 गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होत आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली.

त्यानुसार कोणताही मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये व मतदानाची टक्केवरीत वाढ होण्यासाठी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गृह मतदान पथकाने मतदारांच्या दारी पोहोचून त्यांचे मत बॅलेट पेपरवर नोंदविले आहे. गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्रात दिव्यांग, वृध्द मतदारासाठी गृह मतदान आयोजित केले आहे. यावेळी मतदान करतांना एक वृध्द महिला व दिव्यांग व्यक्ती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानिर्मिती कोराडी औष्णिक विद्युत विहार यांचे सहकार्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे मतदान वाढीसाठी आव्हान

Tue Apr 16 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – पंचायत समिति कामठी अंतर्गत विशेष अभियान कामठी :- आज .१६ एप्रिल२०२४ ला स्वीप अंतर्गत पंचायत समिती कामठी अंतर्गत महानिर्मिती कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे मागील निवडणुकीत या क्षेत्रात ५० %पेक्षा कमी मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी “अधिकार है”महागीत सादर केले.तसेच सौम्या शर्मा यांनी १००% मतदान करण्याचे आव्हान कोराडी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी रहिवासी यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com