मुंबई, दि. 15 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. त्यांच्या एकजूटीतून जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला. आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत नेऊ या , असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com