नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दि. २९ ऑक्टोबरला (रविवार) श्री क्षेत्र आदासा येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून भाविकांनी सकाळी साडेसहापर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. यावेळी ना. नितीन गडकरी स्वतः सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे यावेळी पठन होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजन समितीने नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व भाविकांना आमंत्रित केले आहे. संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांसह भाविक आपल्या कुटुंबासह व्यक्तिशः देखील यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. इच्छुकांनी २० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांना एक फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. त्याद्वारे त्यांना मंडळातील सहभागींची संख्या, प्रमुखांचे नाव आदी माहिती द्यायची आहे. भाविक स्वतःच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या संदर्भातील माहितीसाठी मंत्री महोदयांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ०७१२-२२३९९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजन समितीने कळविले आले.