अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया बाजार परिसरातील एम एम रब्बानी शाळेत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीशी शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध भादवी कलम 354, आर डब्लू 8/12 पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाचे नाव अतिकुररहमान वय 54 वर्षे रा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मे 2022 ला सकाळी 11 दरम्यान शाळेत शिक्षण घेणारी फिर्यादी पीडित विद्यार्थिनी ही शाळेत पुस्तक घ्यायला गेली असता सदर आरोपी शिक्षकाने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला पुस्तके एकत्र ठेवण्याचे संगीतल्यावरून पुस्तके एकत्र करीत असता आरोपी शिक्षकाने तिच्या शरीरास लज्जा निर्माण होईल असे अश्लील चाळे करून विनयभंग केल्यावरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून.बातमी लिहिस्तोवर आरोपी अटकेबाहेर आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com