नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका! – चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका

· राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका.

· संजय धोत्रे यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्याचा निषेध

· चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका

मुंबई :- अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल अभद्र बोलून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

पुढे ते म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीने वागू नका.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिल्लीला व्यापारी निवडणून द्यायचा की जनसेवक, जनतेने ठरवावे - नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात

Fri Apr 5 , 2024
– दक्षिण नागपुरातील इंडिया आघाडीची सभा “हाऊसफुल” नागपूर :- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वतःला व्यापारी म्हणतात. उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी सामान्य जनतेला लुटण्याचे काम भाजप करीत आहे. असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. दिल्लीला व्यापारी पाठवावा की जनतेचा सेवक हे नागरिकांनी ठरववावे असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com