“मराठी उद्योग समूहाचा धडाडीचा वारसदार हरपला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली

मुंबई :- घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समूहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समुहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Fri Nov 3 , 2023
मुंबई :-  व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती. बेडेकर ब्रँड उभा करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com