शिक्षणाचा खेळखंडोबा बंद करा मनसे वाडी ने नायब तहसीलदार शिंदे  तर्फे मुख्यमंत्री याना दिले निवेदन

वीस पटसंख्येच्या शाळाबंदीचा निर्णय रद्द करा गरीबांच्या मुलांना शिकू द्या मुख्यमंत्री साहेब 

नागपूर :-  राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसे वाडी चे अनिल पारखी, व दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वात विरोध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या मराठी गोर-गरीब, वंचित, बहुजन व शेतकऱ्यांची मुले आणि मुले कायमची शिक्षणापासून वंचित होतील, या निर्णयाचा मनसे वाडी कडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. या पत्रात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास होणाऱ्या धोक्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष केंद्रित करण्यात आले.

महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात देशातील स्त्री शिक्षणाचां पाया रोवला गेला शाहू छत्रपतींच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण मोफत देणारे छत्रपती शाहू महाराज. महाराष्ट्र राज्यात वरील संदर्भीय पत्रानुसार राज्यातील २० च्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची सुरू असलेली तयारी अतिशय दुर्दैवी आहे.

शिक्षण हक्क कायदयानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा सरसकट बंद झाल्यास लाखो गोरगरीब, वंचित, बहुजन व शेतकऱ्यांच्या व कष्टकरी जनतेचे मुले व खास करून मुली शिक्षणापासून वंचित होतील. २० च्या आत पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा या दुर्गम भागात व वाहतुकीच्या सोयी सुविधा नसणाऱ्या ठिकाणी आहेत. अश्यावेळी या शाळा बंद झाल्यास 205 शाळा बंद होतील इथे शिकणारे लाखो विद्यार्थी अनपड राहतील मुलींचे गळतीचे प्रमाण आधीच अधिक असताना या निर्णयाने गळतीचे प्रमाण वाढणे, बालमजुरी, बालविवाह अश्या इतरही सामाजिक समस्या यातून निर्माण होण्याची शक्यता आहे, हा धोका मुख्यमंत्र्यांच्या लक्षात घेता हा शासन निर्णय रद्द कराव अशी मागणी मनसेचे अनिल पारखी दीपक ठाकरे यांनी केले

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये चालणाऱ्या चांगल्या उपक्रमांच्या, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तथा सरकारी शाळा नवीन रूप घेत आहेत. सरकारी शाळांकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा, पालकांचा दृष्टिकोन बदलत आहे, गेल्या काही वर्षांत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. अश्यावेळी सरकार म्हणून आपण या शाळांच्या शिक्षकांच्या, पालकांच्या पाठीशी ठाम उभे रहाल अशी अपेक्षा असतांना आलेले हे पत्र व सुरू असलेली कार्यवाही, शाळा व शिक्षकांचे खच्चीकरण करणारी व त्यांना निराशेच्या लाटेत लोटणारी ठरणार आहे. आपण त्वरित या बाबीची दखल घेऊन हा निर्णय थांबवावा अशी मागणी निवेदनात  मुख्यमंत्री यांच्याकडे मनसे वाडी यांनी केली आहे.

मनसे जिल्हा अध्यक्ष नागपूर आदित्य भाऊ दुरुगकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अनिल पारखी, दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वात वैभव तुपकर, संतोष पाल, शुभम कळंबे,दिलीप टापरे,सूरज भलावी, विठोबा घुरडे,संदीप भणगे, नितीन पिठोरे, अजिंक्य वाघमारे, मुकेश मुंडले, अश्विन कोडापे मनसे सैनिक उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com