मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

-‘प्रशासनातील मराठी’ या विषयावर आज परिसंवाद

 नागपूर, दि. 24 : प्रशासनामध्ये मराठी भाषेचा  वापर जास्तीत जास्त व्हावा. तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रशासनातील मराठी या विषयावर उद्या मंगळवार, दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

            प्रशासनातील मराठी या विषयावर आधारित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा राहणार आहेत. परिसंवादात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, अभ्यासक आशुतोष शेवाळकर तसेच विदर्भ साहित्य संघाचे विलास मानेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

            मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, विभागीय भाषा संचालक हरेश सूर्यवंशी तसेच विभागीय ग्रंथपाल श्रीमती विभा डांगे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भाजप द्वारे राष्ट्रीय बालिकादिन उत्साहात संपन्न...

Mon Jan 24 , 2022
नागपूर –   पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या द्वारे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमात  बालिकांच्या सन्मानार्थ शैक्षणिक व  स्वास्थ विषयक योजनाच्या उपक्रमावर आधारित भाजप वैद्यकीय आघाडी व भाजप मध्य नागपूर महिला मोर्चा द्वारा भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्य वकिलपेठ येथे लहान बालिकांची आरोग्य तपासणी व त्यांना कुपोषण व  स्वच्छतेच्या विषयी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com