संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23:- आर्किटेकट हेमंत निंमगडे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात गुंड रंजित सफेलकर यांच्या मालकीचे कामठी खैरी मार्गावर असलेले राजमहल सभागृह हे अनधिकृत बांधकाम असल्याप्रकरणी मागील 28 एप्रिल 2021 ला या अनधिकृत बांधकामाचे जमीनदोस्त करण्याच्या कामाला गती देण्यात आली होती मात्र न्यायालयीन आदेशान्वये मिळालेल्या स्थगितीमुळे या जमीनदोस्त कामाला थांबा देण्यात आला होता तर या राजमहाल च्या संबंधितांने हे तोडलेले बांधकामात नव्याने बांधकाम करीत सुसज्जीत केले होते मात्र एन एम आर डी सी नागपूर विभागाच्या आदेशान्वये आज 23 जून ला पुनश्च राजमहाल वर जमीनदोस्त ची कारवाही होणार होती . यानुसार पोलीस विभाग सुसज्ज राहून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तयार होता मात्र वेळीच आलेल्या आदेशानव्ये या जमीनदोस्त कारवाहिला पुनश्च ब्रेक दिल्याने पोलिसांना उलटपायी परतावे लागले असले तरी ही कारवाही काही दिवसासाठीच थांबली असली तरी काहो दिवसानंतर राजमहाल जमिनदोस्त ची करवाही होणार हे निश्चित असल्याचे बोलले जाते.