मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये – माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये अशी मागणी कांग्रेस पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.

शाळेमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्यापनात मनाचे श्लोक आणि भगवद् गीतेचा 12 वा अध्याय पाठ करावा लागणार आहे.राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत सूचना केली आहे. देशात मनुस्मूर्ती या पुस्तकावर बंदी असताना विद्यार्थ्यांच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मूर्तीचा समावेश कसा करण्यात येत आहे असा प्रश्नदेखील राज्य सरकारला विचारण्यात येत आहे.म्हणून नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचा समावेश करू नये तसे झाल्यास जनभावना दुखावतील व त्याचे तीव्र पडसाद उमटतील त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नविन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये अशी मागणी कांग्रेस चे पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषदचे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेंट जोसेफ कांन्व्हेंटच्या महेक जितेंद्र बागडे या विद्यार्थ्यांनीचे १०वी च्या परीक्षेत सुयश

Thu May 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील गादा या गावातील महेक जितेंद्र बागडे या विद्यार्थ्यांनीने इंग्रजी माध्यमाच्या सेंट जोसेफ कांन्व्हेंट शाळेतुन १०वी च्या परीक्षेत प्राविण्यासह ९१.०० % गुणवत्तापूर्ण अंक प्राप्त केले. वडील ऑटोचालक,अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील या मुलीने मिळविले यश कौतुकास्पद आहे. शिवसेना ( उबाठा)चे विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, जिल्हा संघटक राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव यांनी तीच्या घरी भेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com