संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील गादा या गावातील महेक जितेंद्र बागडे या विद्यार्थ्यांनीने इंग्रजी माध्यमाच्या सेंट जोसेफ कांन्व्हेंट शाळेतुन १०वी च्या परीक्षेत प्राविण्यासह ९१.०० % गुणवत्तापूर्ण अंक प्राप्त केले. वडील ऑटोचालक,अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील या मुलीने मिळविले यश कौतुकास्पद आहे. शिवसेना ( उबाठा)चे विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, जिल्हा संघटक राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव यांनी तीच्या घरी भेट देऊन तीचे अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विकास साखरे, मेहकचे आई,काका,काकु उपस्थित होते.