मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

– पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय

– सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

– 16 राज्यस्तरीय सदिच्छादूत

मुंबई :- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रणिता सोमण, शिवम लोहकरे, मिलिंद शिंदे, आरुष बेडेकर, वेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधे, मयुरी लुते, प्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

औरंगाबादमध्ये नवेली देशमुख, उस्मानाबादमध्ये राहुल लखाडे, धुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगी, गडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंदियामध्ये मुनालाल यादव, जळगावमध्ये निलिमा मिश्रा, जालनामध्ये किशोर डांगे, डॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडे, लातूरमध्ये बसवराज पैके, मेघा पवार, सृष्टी जगताप, मुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, मुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगे, नांदेडसाठी भाग्यश्री जाधव, सृष्टी जोगदंड, कपिल गुडसुरकर, नंदूरबारसाठी प्रतिक कदम, रिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकर, सागर बोडके, पालघरसाठी विक्रांत केणी, पूजा पाटील, शुभम वनमाळी, भाविका पाटील, पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर , आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

रायगडसाठी तपस्वी गोंधळी, रत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी माने, सांगलीमध्ये संकेत सरगर, सातारामध्ये आदिती स्वामी, सिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारी, सोलापूरमध्ये तानाजी गालगुंडे, आनंद बनसोडे, प्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईर, वर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

यवतमाळमध्ये अंकुर वाढवे, आकाश चिकटे, चंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत पाईकराव, शुभम म्हस्के, सुनील तुरुकमाने, डॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशाचा विकास फक्त मोदीच करु शकतात - देवेंद्र फडणवीस

Thu Apr 18 , 2024
– 70 वर्षात काॅग्रेसने गोर गरीबांना ठेवले वंचित – पारशिवनी येथे अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हस्ते उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत पारशिवनी :- पारशिवनी येथील जुना बसस्थानक चौकात आज ( दि.16) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे उमेदवार राजु पारवे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री तथा विकासपुरुष माननीय देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील विकास कसा होत आहे.व केंद्रात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com