मनपातर्फे सफाई मजदूर पदावर ९२ वारसदारांना स्थायी नियुक्ती

– महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण

नागपूर, ता. ८ : स्वच्छ, सुंदर नागपूर ही शहराची छबी कायम ठेवण्यासाठी सातत्याने स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणा-या ९२ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपामध्ये स्थायी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. मंगळवारी (ता.८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापौर कक्षात प्रतिकात्मक स्वरूपात १० वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र दिले. अन्य सफाई कर्मचा-यांना संबंधित झोन कार्यालयातून स्थायी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

            महापौर कक्षामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमहापौर मनीषा धावडे,  स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, प्रभाग १९चे नगरसेवक धर्मपाल मेश्राम, नगरसेविका नीला हाथीबेड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी गजेंद्र महल्ले, लाड पागे समितीचे इन्चार्ज किशोर मोटघरे, सहायक अधीक्षक रमेश लोखंडे, विशाल मेहता, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, सतीश डागोर, अजय हाथीबेड, आदी उपस्थित होते.

            यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार ९२ पात्र वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र देण्यात आले. नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर बनवून स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहराची रँक वाढविण्यासाठी आपल्या हातून चांगले काम होईल अशी, आशा महापौरांनी यावेळी व्यक्त केली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनुसार याच आठवड्यात मनपातर्फे २०० लोकांची यादी प्रकाशित केली जाणार असून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या २-३ महिन्यात २०० लोकांना स्थायी नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी यावेळी दिली. तसेच सर्व नियुक्त झालेल्या सफाई कामगारांना शुभेच्या दिल्या.

स्थायी नियुक्ती पत्र प्राप्त वारसदार

            सोनू शेखर चमके, अक्षय किशोर शिर्के, विपीन निरंजन चौव्हाण, प्रतीक गणेश शामकुवर, पिंकी अमित देवधरे, राणी सुनील बकसरे, प्रिया आकाश मकरंदे, नकुल श्रीधर रामटेके, विजय हरिकिशन कैथेलकर, सुमित दुर्गेश डकाहा, चंद्रभागा शक्ती वाघमारे, समाज गुणवंत तिरपुडे, सुषमा रवी मतेलकर, आकाश कृष्णा पाठक, ममता संतोष शुक्ला, राजश्री राजन त्रिमिले, राहुल अशोक चिचोंडे, धर्मेंद्र विश्वनाथ शेंडे, अंकित फुलचंद नकाशे, प्रीती उमेश बेहुनिया, मिथुन विजय मेश्राम, गौरी कृष्णा गौरे, विशाल ईश्वर तायवाडे, पूजा दुर्योधन मेश्राम, मनीष शंकर वामन, दिनेश गणेश करिहार, सुनीता राजेश कटारिया, शोभा सुधीर खंडारे, संतोष लक्ष्मण मेश्राम, बल्लू मुन्ना डकाहा, आकाश रामलाल सिरमोरीया, रुपेश रवींद्र पाटील, रोहित किशोर गोराडे, प्रफुल्ल विनायक रामटेके, पंकज लक्ष्मण चुटेलकर, पूजा सचिन कळसे, कमल रामदास हाथीबेड, तारा अशोक डकाह, मंगेशकुमार लक्ष्मण गजभिये, आकाश मनोज मस्ते, स्वाती एवीन अंबाला, अनिस रणजित जनवारे, अक्षय सुधीर सहारे, दुर्गेश अशोक सावरकर, सपन अशोक शुक्लवारे, रोहिणी जगन्नाथ करिहार, मोहन रमेश मस्ते, कविता ललित मोहिते, सुशील सुरेंद्र समुन्द्रे, प्रफुल्ल मिलिंद सहारे, राहुल अनिल महाजन, वैशाली सिद्धार्थ ढोके, आतिश सुंदरलाल मलिक, सोनू पृथ्वीराज कोंढावे, श्रीकांत उमेश समुन्द्रे, चंद्रिका अमित डकाह, आकाश प्रीतम बकसरे, रीना राकेश समुन्द्रे. महेश प्रल्हाद समुन्द्रे, आतिश अशोक चव्हाण, निकलेश दीपक मतेलकर,  विशाल मनोहर मलिक, आकाश राजू उके, शुभम रमेश फुलझेले, प्रवीण गोविंदा वासनिक, निखिल देविदास गडपायले, निकेश बबली बक्सरे, ज्योती विशाल डाकाह, शीला अजय तांबे, पंकज मुरली गौरे, रीना नरेश राणे, निखिल हिरामण पिल्लेवार, वीरेंद्र विजय शेंद्रे, अजय अमर गहरे, रोहित राजू बेलचक्रे, विवेक प्रतीक नंदेश्वर, रीना अमित डकाह, गौरव अशोक माटे, नरेंद्र सोमा खोब्रागडे, जितेंद्र भाऊदास बर्वे, रीना रामसिंग बिसे, नयन अशोक चौव्हाण, अरविंद दशरथ वाघमारे,  दिवाकर दुर्गाप्रसाद कोरी, रिंकू प्रफुल्ल भागवतकर, अमोल प्रल्हाद विरहा, नितीन बल्लू बोयत, दिनेश प्रेमदास उके, अनुराग कृष्णा खरे, निखिल बबन पाटील, मिथुन चुन्नीलाल वाघमारे आणि मनोज चंद्रभान भिमटे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्रभाग २६ मध्ये एसटीपीकरिता ५ एकर जागा देण्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश

Tue Feb 8 , 2022
– मनपा व नासुप्र प्रशासनाच्या अधिका-यांची घेतली बैठक नागपूर, ता. ८ : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २६ मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) तयार करणे आवश्यक आहे. या भागातील लोकसंख्या लक्षात घेता येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५ एकर जागा मनपाद्वारे नागपूर सुधार प्रन्यासला देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.             प्रभाग २६ मधील समस्यांच्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com