अमली पदार्थ विरोधी पथकाची नागपुरात मोठी कारवाई

– एकूण 2665000/- रु मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स सह मुद्देमाल जप्त..

नागपूर – अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 250 ग्राम मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 25 लाख इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीतांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

प्राप्त माहितनुसार दि. 09/07/2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या खबरे वरून पोलिस स्टेशन बेलतरोडी हद्दीत महेश रेस्टॉरंट समोर रोडवर खापरी परसोडी पो स्टे बेलतरोडी नागपूर येथे आरोपी नामे 1).इंब्राहिम खान अकबर खान वय. 53वर्ष रा. हसन बाग नागपूर 2). शेख फारुख शेख मेहमूद.वय. 42 रा. मोठा ताजबाग नागपूर 3). रिझवान खान वाहीद खान रा. मोठा ताजबाग यांना पोलिस स्टाफ चे मदतीने ताब्यात घेतले असता त्यांचे कडे 250 ग्राम मेफेड्रोन (mephedron) ड्रग्स पावडर 2500000/- रू. 4 मोबाईल किंमत 31000/- एक कार किंमत 100000/- नगदी 34000 असा एकूण 2665000/- रू असा मुद्देमाल मीळून आल्याने तो जप्त केला. या आरोपींविरोधात पो.स्टे. बेलतरोडी येथे 309/2022 कलम 8 (क), 22 (क)29 NDPS ॲक्ट सह कलम 142 म. पो.का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर  कामगीरी नागपुर शहराचे अमीतेश कुमार पोलीस आयुक्त नागपुर शहर, अश्वती दोरजे सह.पोलीस आयुक्त, नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे),  चिन्मय पंडीत, पोलीस उप-आयुक्त, (डिटेक्षन), गुन्हे शाखा,  रोशन पंडीत सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा नागपूर शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मनोज सिडाम, सपोनि बद्रीनारायण तांबे, उमेश नासरे, पोहवा प्रमोद धोटे, समाधान गिते, परमेश्वर  कडु, नापोशि विनोद गायकवाड, नारायण पारवेकर, मनोज नेवारे, सुरज भानावत, नितीन साळुंके पोशि मंगेश मापारी, सहदेव चिखले, राहुल पाटील, मनापोशि अनुप यादव केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com