बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत www.awards.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबई शहर व उपनगरातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. वयवर्ष ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो, संस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. पात्र उमेदवार आणि संस्थांनी विहित वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार्यशाळेत पत्रकारांनी गिरवले प्रमाणलेखनाचे धडे

Sat Aug 19 , 2023
– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम नागपूर :- नियमित वृत्तपत्रीय लिखाणामध्ये प्रमाणलेखनाचा वापर व्हावा, वारंवार होणाऱ्या चुका व चुकीच्या शब्दांचा वापर टळावा. वृत्तलेखनाचा दर्जा वाढवा यासाठी शुद्धलेखन व योग्य शब्दांच्या वापरासंदर्भातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माध्यम प्रतिनिधींच्या दैनंदिन लिखाणात सुधारणा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com