नागपूर :- दिनांक ०४.११.२०२३ चे ०५.४५ वा. चे सुमारास फिर्यादी अशोक तारानाथ मुन वय ६३ वर्ष रा. प्लॉट नं. ५८, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर हे तसेच त्यांचे सोबत मित्र नामे उत्तम मणिराम पवार वय ५५ वर्ष रा. प्लॉट नं. ६१, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर व ईतर एक मित्र सुरेश डाग असे तिघे नेहमी प्रमाणे सकाळी मॉनींग वॉक करीता घरून निघुन मंगदीप नगर कडुन वैसा चौका कडे पायदळ जात असता श्रीपाद लॉनचे पुळे नाल्या समोर एका होन्डा कंपनीची मोपेड गाड़ी क. एम. एच. ४९ बी.एन ५४६२ चा चालक महिलेने तिचे ताब्यातील मोपेड गाडी भरधाव वेगाने व हयगईने, निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे मित्र उत्तम पवार यांना मागुन धडक देवून गंभीर जख्मी केले. जख्मी यांना उपचाराकरीता सिम्स हॉस्पीटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान दि. ०८.११. २०२३ चे १८.४५ वा. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि गुडेकर त्यांनी आरोपी मोपेड चालक महिलेविरुद्ध कलम २७९, ३०४(अ) भा. देवी अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरु आहे.