महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ तथा उपायुक्त (सा.प्र.) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांचे आदेशान्वये नागपूर विभागात 30 जानेवारीला मतदान व 2 फेब्रुवारीला मतमोजणी प्रक्रीया पार पाडली जाणार असून जिल्हयाची संवेदनशिलता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोणातून 28 जानेवारीला दुपारी 4 वाजेपासून ते 30 जानेवारी दुपारी 4 वाजेपर्यंत तसेच 2 फेब्रुवारीला निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई केली आहे. कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता संपूर्ण जिल्हयाच्या मतदानाच्या निर्वाचन क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135-सी अन्वये निवडणूक होत असलेल्या जिल्हयातील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निर्वाचन क्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वीत असलेल्या सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, सीएल / एफएल / टिओडी-3, नमुना-ई, एफएल-1, एफएल-2, एफएल-3. एफएल/बीआर-2 व टड 1 अनुज्ञप्त्या 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले आहे.

या आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांचे विरुद् कडक कारवाई करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाईन 14567)

Thu Jan 19 , 2023
नागपूर : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आणि त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागविण्यासाठी सेवांचे नवीन मॉडेल विकसित करणे हे ही तितकेच आवश्यक आहे.याकरिता केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!