
– वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकांनी वाचनालयात आज पासून वाचनालयाची वेळ सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 6 ते 9 दरम्यान वाचनालयात येण्याचे वार्ताहर व एजंटचे आव्हान
कोदामेंढी :- दिनांक 27 नोव्हेंबर बुधवार ला दुपारी बारा दरम्यान मौदा येथील ओम कॉम्प्युटरचे संचालक पंकज पाठक यांनी कोदामेंढी येथील वार्ताहर किशोर साहू यांना, मौदा शहरात सर्वच वृत्तपत्राचे प्रतिनिधी असतांनाही,त्यांच्या समस्या प्रकाशित करण्यासाठी भ्रमणध्वनी केले असता सध्या अरोली- कोदामेंढी जि प सर्कल मध्येच नव्हे मौदा तालुक्यात आपल्या लेखणीतून जनसामान्याचे व शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे, सर्वच विषयाशी संबंधित निष्पक्ष ,निर्भीड वृत्तांकन करून भ्रष्टांवर प्रहार करून सज्जनांच्या पुरस्कार करणारे, किशोर साहू यांना ‘तहलका माजवणारे वार्ताहर’ म्हणून बोलताना उल्लेख केला व त्यांची समस्या सांगितली. या मौदा तालुक्यात तहलका माजवणाऱ्या वार्ताहर, एजंट साहू व त्यांचे सहकारी एजंट रमेश हटवार, पैलेश मेश्राम (अडेगाव), यांनी उद्या 28 नोव्हेंबर गुरुवारपासून येथील घरघर लागलेल्या वाचनालयाला सामाजिक भावनेतून हातभार लावून सर्वच हिंदी मराठी व इंग्रजी वृत्तपत्र वाचकांसाठी उपलब्ध केले असून, स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी, वाचनाची आवड असणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकांनी आता या वाचनालयात वाचनालयाची वेळ दररोज सकाळी आठ ते 11 व सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान सर्वच प्रकारचे वृत्तपत्र वाचण्यासाठी यावे असे आव्हान या वार्ताहर व एजंटनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना काळापासून 3829 लोकसंख्या असणाऱ्या कोदामेंढी या गावातील वाचनालयाचे अनुदान बंद असून ग्रंथपालांचे अनुदानही बंद आहेत, त्यामुळे कोरोना काळापासून येथे सर्व सोयीसुविधा शौचालय बाथरूमची पंखे व विद्युत ची व्यवस्था असूनही वृत्तपत्रच येत नाही. त्यामुळे येथील वाचणार आहे सकाळच्या वेळेस बंद असते तर सायंकाळच्या वेळेस येतील ग्रंथपाल सुशील खंडाळे अभ्यास करण्यासाठी उघडून बसतात.त्यामुळे येथील वाचक वर्ग वाचनालयाकडे फिरकतच नाही. त्यामुळे हे वाचनालय फक्त नामधारी असून शोभेची वस्तू झाली आहे. याबाबतची वृत्तही सर्वच हिंदी व मराठी दैनिकांमध्ये एक महिन्यापूर्वी प्रकाशित करण्यात आले असूनही अजूनही ग्रंथालयाचे व ग्रंथपाल सुशील खंडाळ्याचे मानधन आले नसल्याचे त्यांनी आज सांगितले. त्यामुळे सामाजिक भावनेतून येथील वार्ताहर , एजंट किशोर साहू एजंट रमेश हटवार व पैलेश मेश्राम (अडेगाव) यांनी उद्या 28 नोव्हेंबर गुरुवारपासून सर्वच हिंदी ,मराठी, इंग्रजी वृत्तपत्र वाचनासाठी येथे उपलब्ध केले असून कोरोना काळापासून पाठ फिरवलेल्या वाचकवर्गांनी पुन्हा येथे नियमित येऊन स्वतःला अपडेट करून या वाचनालयातील येणाऱ्या सर्वच वृत्तपत्राचे वाचन करून या वाचनालयाचे नाव सार्थक करावे असे आव्हान सामाजिक भावनेतून येथील वार्ताहर , एजंट साहू व त्यांचे सहकारी दोन्ही एजंट यांनी केले आहे.
मौदा तालुक्यातील कोदामेंढी पेक्षा कमी लोकसंख्या, अर्धीही लोकसंख्या असलेल्या इतर गावातील वाचनालयाचे व ग्रंथपालाचे अनुदान सुरू असून, संबंधित विभागाने येथीलच वाचनालय व ग्रंथपालाचे अनुदान बंद करून, येथील वाचनालय व ग्रंथापालावर संबंधित विभाग अन्याय तर करत नाही ना? असा प्रश्नही या निमित्ताने संबंधित वार्ताहर व त्यांचे सहकारी दोन्ही एजंट यांनी मांडला आहे.


