
नागपूर : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आणि त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागविण्यासाठी सेवांचे नवीन मॉडेल विकसित करणे हे ही तितकेच आवश्यक आहे.याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन(14567) सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फॉऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन-( 14567) जनसेवा फौंडेशन, पुणेतर्फे चालविण्यात येत आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये एल्डरलाईन-14567 या हेल्पलाईनच्या कार्याची सुरुवात झाली. 1 ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती यांनी एल्डरलाईन- 14567 या ज्येष्ठांसाठीच्या राष्ट्रीय हेल्पलाईनचे लोकार्पण देशास केले आहे.

राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी पंचाहत्तर हजाराहून अधिक कॉल आले. त्यामधून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे मदत हेल्पलाईनने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कनेक्ट सेंटरफिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्था सातत्याने कार्यरत आहेत. हेल्पलाईन सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत आहे..

एल्डरलाईन- 14567 मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवाः
माहिती: आरोग्य जागरूकता, निदान, उपचार निवारा, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठां संबंधी अनुकूलउत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदी.
मार्गदर्शन: कायदेविषयक ( वैयक्तिक आणि कौटुंबिकस्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी) आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना.
भावनिक आधार: समर्थन चिंता निराकरण नातेसंबंध विषयक व्यवस्थापन मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण )
क्षेत्रीय पातळीवर मदत:- बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध,ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेणे.
@ फाईल फोटो