– पोलीस स्टेशन भिवापूरची कार्यवाही
भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा जावराबोडी येथे पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदी करून टिप्पर क्र. एम एच ४०/ बीएल ६१०१ वा चालक आरोपी नामे लोकेश दयाराम देशमुख वय २५ वर्ष २. क्लिनर विक्रांत प्रकधारी बुकावन वय २४ वर्ष दोन्ही रा सिंधपुरी तह पवनी जि भंडारा याने आपल्या वाहनात ०६ ब्रास रेती मालक नामे ३) वासुदेव रमेश बुकावन वय ३६ वर्ष रा बायपास रोड उमरेड जि नागपूर याचे सांगणे वरून आरोपीतांनी संगणमत करून आपले टिप्पर १) टिप्पर कं, एम एच ४०/ बीएल ६१०१ला दुस-या क्रमांकाची नंबर प्लेट लावुन फसवणुक करून बनावटी परवाना तयार करून दुस-या टिप्परच्या कमांकाची रॉयल्टी ठेवून अवैधरित्या विनापरवाना टिप्परमध्ये आपले आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसुल बुडवुन रेती वाळुन भरून मालमत्तेचे नुकसान करून रेतीची चोरटी वाहतुन करतांना मिळुन आल्याने नमुद टिप्परमध्ये त्यामध्ये ६ ब्रास रेती कि. ३०,०००/- रू. तसेच टिप्पर कं. एम एच ४०वीएल ६१०१ किंमती २०,००,०००/- रू असा एकूण २०,३०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीताविरूद्ध कलम ३७९, ४२०, ४६८,१०९, ३४ भा.द.वी. सहकलम ४८ (७, ४८ (८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१,०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पुढील तपास पोहवा प्रफुल माहुरे हे करीत आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल व त्यांचे स्टाफनी पार पाडली.