नागपूर ग्रामीण जिल्हयात राबविण्यात आले कोबिंग ऑपरेशन एकूण ०४ आरोपीतांवर कारवाई

नागपूर :- दिनांक ०१/०७/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधिक्षक संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे रामटेक विभाग रामटेक अतिरीक्त कार्यभार कन्हान विभाग कन्हान, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड, परि पोलीस अधीक्षक अनिल मस्के, परि पोलीस उप अधीक्षक झालटे, पोलीस निरीक्षक मकेश्वर पोलीस स्टेशन कन्हान, पोलीस निरीक्षक मुळुक, मानकर, ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण सपोनि. आशिष ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, आशिष मोरखडे, सहायक पोलीस निरीक्षक चौव्हान, पोलीस हवालदार मुदस्सर जमाल, हरिश सोनभद्रे, पोलीस शिपाई आकाश सिरसाट, अश्विन गजभिये, निखिल मिश्रा, अनिल यादव तसेच विविध पोलीस स्टेशन व कार्यालयीन २५ अधिकारी व ११० अमलदार यांच्या सह पोस्टे कन्हान हददीत कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले असता सदर ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन हददीत एकुण ४ आरोपीतांचे राहते घराची झडती घेण्यात आल्या. त्या दरम्यान आरोपी नामे १) साहिल अब्दुल खान, रा. खदान नं. ०३ कन्हान यांच्या ताब्यातुन १ माउझर १ जिवंत काडतुस २) परशुराम मखंजु गौतम रा. फुकट नगर कन्हान यांच्या ताब्यातुन १ देशी कट्टा, १ जिवंत काडतूस व १ लोखंडी तलवार ३) अमन अजित सिंग, रा. खदान नं. ०६ कन्हान यांच्या ताब्यातून २ लोखंडी तलवार ४). निखील उर्फ सन्नी अनिल गजभिये रा. अशोक नगर कन्हान यांच्या ताब्यातून १ लोखंडी कोयता मिळुन आल्याने सदर ४ आरोपीतांवर भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला. असे एकुण ०२ अग्नीशत्र, ०३ तलवार ०१ कोयता जप्त करून आरोपीतांवर भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई करण्यात आली. सदरचे कोबिंग ऑपरेशन पोलीस अधीक्षक यांचे आदेशावरून रात्री १२.०० वाजेपासुन ०४ वाजे पर्यंत चालले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरकारी शाळेत लागले हाऊस फुल्ल चे बोर्ड प्रवेशोत्सव उत्साहात साजरा, पहिल्याच दिवशी 100% प्रवेश

Sun Jul 2 , 2023
– मुख्यमंत्र्यांचा हस्ते होणार निवासी शाळेचे उद्घाटन गडचिरोली :- समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा जिल्ह्यात 2 असून विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता तिसरी निवासी शाळा गडचिरोली येथे बांधण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिनांक 8 जुलै रोजी होणार आहे. विदर्भातील शाळा 30 जुन पासून सुरू करण्यात आल्या. नेहमीच खासगी शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरे करण्यात येतात मात्र त्यामानाने सरकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com