पत्रकारांनी नेहमी सत्य पडताळूनच वृत्तांकन करावे – न्या. विकास सिरपूरकर यांचे प्रतिपादन

– उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

नागपूर  – जंगलात प्रत्यक्ष काम करणारे वनकर्मचारी हे जंगल संरक्षणासाठी दिवसरात्र झटत असतात. त्यांच्याही समस्या आहेत. त्याकडे पत्रकारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वनसंवर्धन आणि त्याचे वृत्तांकन योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून पत्रकारांनी नेहमी सत्य पडताळूनच ते मांडावे. जे वनकर्मचारी झटत आहेत, त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काम करणे गरजेचे असल्याचे मत सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.
वनराई फाउंडेशन, नागपूर व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना यांच्या वतीने दरवर्षी जागतिक वनदिवसानिमित्त स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार व्यक्तीला किवा  संस्थेला देउन गौरविण्यात येते.
यंदाचा हा पुरस्कार लोकसत्ताच्या उपसंपादक राखी चव्हाण यांना न्या. विकास सिरपूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शंकरनगरातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्मिकचे विकास गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिकचे रंगनाथ नाईकडे, डॉ. गिरीश गांधी, अजय पाटील , अनंतराव घारड, राखी चव्हाण, समीर सराफ, डॉ. पिनाक दंदे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे वन्यजीव प्रमुख सुनील लिमये यांनी भूषविले.
याप्रसंगी बोलतांना न्या. सिरपूरकर म्हणाले, जंगलात प्रत्यक्ष काम करणारे वनकर्मचारी हे जंगल संरक्षणासाठी दिवसरात्र झटत असतात. त्यांच्याही समस्या आहेत. त्याकडे पत्रकारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वनसंवर्धन आणि त्याचे वृत्तांकन योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून पत्रकारांनी नेहमी सत्य पडताळूनच ते मांडावे. जे वनकर्मचारी झटत आहेत, त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्तकेले.
वनांच्या संरक्षणात लोकांचा सहभाग महत्वाचा असून त्यांनी वनविभागासोबत काम करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना विकास गुप्ता यांनी व्यक्त केले.
जंगल वाचविण्यासाठी वनकर्मचार्‍यांसह न्यायालयाचाही वाटा महत्वपूर्ण आहे. आज वाघ वाढले तर संघर्ष वाढल्याचे दिसते. परंतु असे नाही. प्रत्यक्षात आपण त्यांच्या क्षेत्रात जात आहोत आणि म्हणून संघर्षाचे प्रकार घडत आहेत. वनाधिकारी वाघासाठीच नाही तर नागरिकांसाठीही आहे. पण वाघ वाचला तरच आपण वाचणार, हे पटवून देण्यासाठी आम्ही कमी पडतोय, त्यामुळे यावर नियमित कार्य करण्याची गरज असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात सुनील लिमये यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देतांना राखी चव्हाण म्हणाल्या, विरोधात लिहणे हा पत्रकारांचा उद्देश कधीच नसतो. अलीकडे वनाधिकार्‍यांचा माध्यमांशी समन्वय कमी झाला असून, तो वाढविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी तर संचालन अजय पाटील यांनी केले. संस्कृती पाटील यांनी राखी चव्हाण यांचा परिचय ऊपस्थितांना करून दिला.आभार निलेश खांडेकर यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. गिरीश गांधी, सौ. प्रगती पाटील, मुख्य वनसंरक्षक श्री नाईकवाडे, समिर सराफ, संजय पैडलेवार, अनंतराव घारड, गोपाळ ठोसर, डॉ. पिनाक दंदे, शुभंकर पाटील, सौरभ मगरे, आणि वनराई फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Tue Mar 22 , 2022
मुंबई – पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ८ पोलीस अधिकारी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com